🕒 1 min read
औरंगाबाद : शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. सिडकोतील रहिवाशांना त्यांच्या घराचा हक्क देण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचे पर्व सुरू झाले असल्याचे देखील सुभाष देसाई म्हणाले.
क्रांती चौकातील शिवसेना संपर्क कार्यालय या ठिकाणी शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ९) जिल्ह्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, आ. उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करतांना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात व शहरी भागात विकासाच्या माध्यमातून शिवसेना जनतेपर्यंत पोहचत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक पक्षातील आजी माजी पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करू इच्छित आहे.
ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है असे देखील आ.दानवे म्हणाले. यावेळी कन्नड, रत्नपूर येथील अनेक दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश केला. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह कॉंग्रेस आणि भाजप मध्ये अशा प्रकारचे पक्ष प्रवेश सोहळे सुरू आहेत. इतर पक्षातील कार्यकर्त्यांना प्रलोभने दाखवून आपल्या पक्षात घेण्याची रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने येत्या काळात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेत्री अथिया शेट्टी वापरते ‘या’ क्रिकेटपटूचे कपडे! ; फोटो व्हायरल
- क्रांती-समीर वानखेडेंनी गुगल,ट्विटर आणि फेसबुकला खेचले न्यायालयात
- ‘भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे मविआचे कुठलेच कर्तृत्व नाही’
- …’शाहजादे’ राज्य करत आहेत; कोहलीच्या कर्णधार पदावरून राऊतांची प्रतिक्रिया
- नितेश राणेंचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज; हिम्मत असेल तर….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
