Share

अजित पवारांचे मोठे वक्तव्य; बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण…

Published On: 

🕒 1 min read

पुणे: जगभरात पसरत असलेला ओमायक्रॉन (Omicron) हा विषाणू आता देशात आणि त्यापाठोपाठ राज्यात देखील मोठ्या संख्येने ओमायक्रॉन या विषाणूचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे राज्यसरकार नागरिकांना सांगत आहे. ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय देखील पुढे ढकलण्यात आळा आहे.

राज्यात पसरत असणाऱ्या ओमायक्रॉनच्या विषाणू संदर्भात त्याच सोबत लसीकरण संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वक्तव्य केलं आहे. राज्यात १ कोटी ३८ लाख लसीकरण झाले आहे. पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाले आहे. नवीन ओमायक्रॉनसाठी प्रशासन सज्ज आहे. जे पॉझिटीव्ह रुग्ण आलेले होते त्यातील ७ पैकी ५ निगेटीव्ह आले आहेत. हे सगळे बाहेरच्या देशातून आले आहेत. बाहेरच्या देशातून आलेल्या आणखी लोकांना शोधण्याचा प्रयत्न करण्याचे काम सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले.

बूस्टर डोस बाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बूस्टर डोसबाबत काही सूतोवाच केलं, पण आधी दोन्ही डोस पूर्ण करून त्यानंतर बुस्टर डोसचा विचार केला जाईल. सिरमकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण बूस्टर डोसचा (Booster Dose) निर्णय देशाच्या पातळीवर झाला पाहिजे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!