🕒 1 min read
पुणे: जगभरात सध्या ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत आहे. भारतातही ओमायक्रॉनचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण सध्या बघायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ता कुठे कमी होत होता आणि शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता, मात्र ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे.
ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता राज्यातील शाळा सुरू राहणार की बंद करणार यावर सध्या विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत. त्याच सोबत लसीकरण देखील अजून सगळ्यांचे झालेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकार शाळांबाबत अजून कुठला ठोस निर्णय घेत नाहीये. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केलं आहे. ओमायक्रॉन आल्याने शाळाबाबत चर्चा झाली असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले, ओमायक्रॉन आल्याने शाळाबाबत चर्चा झाली असून ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा अंदाज घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ. स्थानिक लोकांमध्ये शाळेवरून निर्णय घेताना वाद होतात. त्यामुळे राज्य स्तरावरच याबाबत निर्णय घेणार आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रवी शास्त्री यांनी भारताच्या तीन दिग्गज खेळाडूंवर दिली मोठी प्रतिक्रिया
- ‘राजकारण करायचं तर समोरून करा, कुटुंबावर हल्ले कशाला’
- ‘टीम इंडियाचा कोच होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले गेले’
- अभिनेत्री अथिया शेट्टी वापरते ‘या’ क्रिकेटपटूचे कपडे! ; फोटो व्हायरल
- क्रांती-समीर वानखेडेंनी गुगल,ट्विटर आणि फेसबुकला खेचले न्यायालयात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
