🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत कायम कोणत्या ना कोणत्या कारणांवरून नेहमीच चर्चेत असते. कंगनाने अनेक चित्रपट केले आहेत. कंगना तिच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. कंगनाचा आता एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कंगना पुन्हा पुन्हा एका व्यक्तीला किस करत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ज्या व्यक्तीला कंगना किस करत आहे तो व्यक्तीदेखील हैराण झाला आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून शिवम सिंह आहे. शिवम हा लॉक-अप या शोचा स्पर्धक होता. नेटकऱ्यांना कंगना आणि शिवम यांची बाँडिंग खूप आवडली. आता दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
लॉक-अपमध्ये एकमेकांशी भांडण करणारे स्टार स्पर्धक लॉकच्या बाहेर मात्र पार्टी करताना दिसत आहेत. पहिल्या शोला प्रचंड यश मिळाल्यानंतर कंगना आणि एकता कपूर यांनी मोठी पार्टी आयोजित केली. या पार्टीला सेलिब्रेटी आणि सर्व स्पर्धकांनी हजेरी लावली होती.
या पार्टीचे सर्व व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर समोर आले होते. जे खूप व्हायरल झाले आहेत. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, कंगना लवकरच ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगनाची मस्ती स्टाईल पाहायला मिळाली. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये अधिकचं उत्सुकता पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
