Share

IPL 2022 : डिव्हिलियर्स आणि गेलचा सन्मान..! संघासाठी दिलेल्या भरीव योगदानाची RCBनं घेतली दखल; वाचा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने हॉल ऑफ फेमची सुरुवात केली आहे. यात संघाने प्रमुख दोन खेळाडू एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांना समाविष्ट केले आहे. डिव्हिलियर्स आणि गेल अनेक हंगामात आरसीबीच्या संघाचा भाग होते आणि त्यांनी संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळेच या दोन्ही खेळाडूंना पहिल्यांदाच आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे.

आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने डिव्हिलियर्स आणि गेलचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला. आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्यानंतर डिव्हिलियर्स भावूक झाला. तो म्हणाला, “सर्व खेळाडू येथे आहेत, माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी खूप भावूक झालो आहे. मी बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तुम्हाला टीव्हीवर पाहून मी, मी खूप उत्साही आहे. मला वाटते की हा हंगाम तुमच्यासाठी खूप खास असणार आहे.”

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “माझ्याबद्दल अशा अद्भुत शब्दांसाठी विराट कोहलीचे धन्यवाद. मी फ्रेंचायझीच्या प्रत्येक सदस्याचे आभार मानतो ज्यांनी हा सेटअप केला. हे माझ्यासाठी खूप खास आहे. आम्ही एक संघ म्हणून खूप छान वेळ घालवला. आम्ही अजूनही या कुटुंबाचा भाग आहोत.” एबी डिव्हिलियर्सने मागील वर्षी यूएईमध्ये आरसीबीसाठी शेवटचा आयपीएल खेळला होता. त्याने ११ हंगामात संघासाठी १५६ सामने खेळले आणि या काळात त्याने ४४९१ धावा केल्या. त्याने संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!