Share

‘औरंगाबाद’चं ‘संभाजीनगर’ होणार का? पहा राजेश टोपे काय म्हणाले…

Published On: 

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण या मुद्द्याभोवती राज्यातलं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकवला. यानंतर विरोधीपक्षांच्या नेत्यांकडून या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले गेले. आता औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावरून आत्ता आरोप प्रत्यारोप होत आहे. आता नामांतराचा मुद्दा पेटलेला असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. यावरून आता नवा वाद उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबादचं नामांतर आता संभाजीनगर असं होणार का? याबाबत राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. राजेश टोपे म्हणाले की, “औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही आणि आमच्या पक्षाच्या तर अजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात, त्यात त्यांना आनंद वाटतो.”

राजेश टोपे पुढे म्हणाले की, “सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर म्हणतात, पण मला वाटत नाही की हा विषय सरकारच्या अजेंड्यावरचा आहे. आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, विजेचे आणि अन्य प्रश्न आहेत. ते सोडवण्याकडे आपण लक्ष देऊ.”

महत्त्वाच्या बातम्या :

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!