🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हायकोर्टात बिनशर्ती माफीनामा सादर केला आहे. यापुढे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Samir Wankhede) आणि त्यांच्या परिवारावर वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी देत मलिकांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांचा माफीनामा स्विकारला आहे. त्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी खोचक टीका केली आहे.
याबाबत सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले आहे. याचा अर्थ दिवाळीत फोडलेले सर्व फटाके फुसके होते. असा खोचक टोला सदाभाऊंनी नवाब मलिकांना लगावला आहे.
याचा अर्थ दिवाळीत फोडलेले सर्व फटाके फुसके होते …!!???????? pic.twitter.com/NUe4hnspnX
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 11, 2021
काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी दिली होती. ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मलिकांनी समीर वानखेडे ‘चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे’ अशी टीका केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात मुंबई हायकोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही मलिकांना चांगलंच सुनावलं आहे. वानखेडेंबाबत कोणतंही विधान करणार नाही, अशी हमी देऊनही टीका केल्याने मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. याप्रकरणी नवाब मलिकांनी हा माफीनामा सादर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक
- ‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’
- मला कोणावरही आरोप करायचे नाहीत पण व्यवस्थेमुळे…- नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
