Share

Raju Shetty | “सदाभाऊ खोत भुरटा माणूस”; ‘त्या’ वक्तव्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

Published On: 

Raju Shetty | पुणे : पुण्यात आज स्पर्धा परीक्षेच्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमात बोलताना  रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली. राज्यकर्ते रेड्यांची औलाद आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

सदाभाऊ खोत यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर भाष्य केलं आहे. “सदाभाऊ खोत हा भुरटा माणूस. भुरटा माणूस काय बोलतो म्हणून मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही”, असं म्हणत राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावला.

पुढे ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एफआरपीबद्दल फक्त आम्हाला आश्वासन दिलं आहे. जर त्याचा शासन निर्णय झाला नाही तर आंदोलन करणार.” त्याचबरोबर एमएसपीसाठी ग्रामसमेत ठराव करून त्याची कागदपत्रे ट्रॉली भरून राष्ट्रपतींना पाठवणार, असंही ते यावेळी बोलताना म्हणालेत.

नेमकं काय म्हणालेत सदाभाऊ खोत?

राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!