Share

मला कोणावरही आरोप करायचे नाहीत पण व्यवस्थेमुळे…- नितीन गडकरी

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : शुक्रवारी(१० डिसें.)एससीएल इंडिया २०२१ परिषदेला संबोधित करतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी देशातील जास्तीत जास्त सरकारी प्रकल्पांना कोणत्या कारणांमुळे विलंब होत आहे यासंदर्भात भाष्य केले आहे.

यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की,’मला कोणावरही आरोप करायचे नाहीत, पण व्यवस्थेमुळे जास्तीत जास्त प्रकल्पांना विलंब होत आहे. मात्र व्यवस्थेमुळे जास्तीत जास्त प्रकल्पांना विलंब होत आहे. सरकारी यंत्रणेत निर्णय न घेणे आणि निर्णयांना उशीर होणे ही मोठी समस्या होती.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सर्वत्र निर्णय घेण्यास एवढा विलंब होतो की त्यामुळे प्रकल्पांची किंमत वाढते. आम्हा सर्वांना माहित आहे की बांधकाम हे भारतातील एक प्रमुख रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. शेतीनंतर, आपल्या जीडीपीमध्ये योगदानाच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.’तसेच पंतप्रधानांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. देशाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित समस्या सोडवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!