Share

Sadabhau Khot | “राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असतात, त्यांना…”; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

Published On: 

Sadabhau Khot | पुणे : पुण्यात अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. पुण्यातीलस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली. राज्यकर्ते रेड्यांची औलाद आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत, असं म्हणत त्यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे.

या कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला आहे. एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळालं नाही म्हणून चिंता करू नका. एमपीएससी नाही झाला तर आमदार आणि खासदार होता येतं, असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

एमपीएससीचा विद्यार्थी गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय आहे? सोमवारी एमपीएससी बाबत एक बैठक घेणार आहोत. एमपीएससी सदस्य निवडीसाठी ओपन, एससी, एसटी, भटक्या विमुक्त जातींना प्राधान्य द्यावं अशी आमची मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, या कार्यक्रमासाठी विधानसभा आमदार अभिमन्यू पवार , सदाभाऊ खोत , बच्चू कडू , आमदार निरंजन डावखरे आणि विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!