Share

IRE vs IND : आयर्लंडमध्येही संजूची हवा..! स्टेडियममध्ये हार्दिकनं सॅमसनचं नाव घेताच घडला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने दोन्ही सामन्यात यजमान संघाचा (IRE vs IND) पराभव केला. भारतीय संघाने पहिला सामना ७ गडी राखून आणि दुसरा सामना ४ धावांनी जिंकला. या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी रात्री डब्लिनमधील मालाहाइड क्रिकेट क्लबमध्ये खेळला गेला. या सामन्यात मालिका जिंकण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्या ३ बदलांसह मैदानात उतरला. दुसऱ्या टी-२० सामन्यात, संजू सॅमसन, हर्षल पटेल आणि रवी विश्नोई यांना ऋतुराज गायकवाड, आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाणेफेकीदरम्यान, दुखापतग्रस्त फलंदाज गायकवाडच्या जागी सॅमसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आल्याचे पंड्याने जाहीर करताच, उपस्थित सर्व प्रेक्षक आनंदाने ओरडले. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या सामन्यातील संजू सॅमसनच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने सलामी देत ७७ धावांची स्फोटक खेळी केली. यादरम्यान सॅमसनच्या बॅटमधून ९ चौकार आणि ४ उत्कृष्ट षटकारही निघाले. या सामन्यादरम्यान त्याने दीपक हुडासोबत महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी केली. दुसऱ्या टी-२० सामन्यात या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या गाठता आली.

भारताने आयर्लंडविरुद्ध २२५ धावा केल्या होत्या. आयर्लंडविरुद्धची ही आतापर्यंतची दुसरी सर्वोच्च टी-२० धावसंख्या आहे. यापूर्वी स्कॉटलंडने आयर्लंडविरुद्ध २५२ धावा केल्या होत्या. भारताच्या २२५ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडनेही वेगवान सुरुवात करत धावांचा पाठलाग करताना भारताला कडवी टक्कर दिली. एका क्षणी सामना भारताच्या हातातून निसटत असल्याचे दिसत होते. अखेर भारताने हा सामना ४ धावांच्या फरकाने जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!