मुंबई : पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उमरान मलिक जितके जास्त सामने खेळेल तितका तो चांगली कामगिरी करेल, असे त्याने म्हटले आहे. कनेरियाच्या म्हणण्यानुसार, उमरानचा वेग आहे पण त्याला त्याच्या लाइन आणि लेंथवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
उमरान मलिकने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ४ षटके टाकली आणि ४२ धावा दिल्या. त्याने एक विकेट घेतली. उमरान मलिकने अखेरच्या षटकात १७ धावांचा बचाव करत संघाला विजय मिळवून दिला. दानिश कनेरियाच्या मते, उमरान मलिक काळाबरोबर शिकेल. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खूप वेगळे आहे.
कनेरिया म्हणाला, ”उमरान मलिक खूप वेगवान गोलंदाजी करतो पण त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तो जितके जास्त सामने खेळेल तितके तो शिकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे दडपण हाताळणे सोपे नाही. आयपीएल फ्रेंचायझीसाठी खेळणे ही एक गोष्ट आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे ही दुसरी गोष्ट आहे, कारण अनेकांची नजर तुमच्यावर आहे.”
भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात आयर्लंडचा ४ धावांनी पराभव करत मालिका २-०ने जिंकली. प्रथम खेळताना भारतीय संघाने ७ बाद २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघाला ५ विकेट्सवर २२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी १७ धावांची गरज होती आणि कर्णधार हार्दिक पंड्याने युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकवर विश्वास व्यक्त केला. उमरानने शेवटच्या षटकात १२ धावा देत संघाला ४ धावांनी विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

