Share

“भारत पूर्वी बुद्धीस्ट होता, नंतर हिंदू झाला, मुघल आल्यानंतर हिंदू मुस्लिम झाले” – रामदास आठवले

Published On: 

पुणे : ज्ञानवापी मशीद शिवलिंग प्रकरण हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. याबाबत न्यायालय जो काही निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही, असंही स्पष्ट मत त्यांना मांडलं होतं. याबाबत केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मोहन भागवत यांनी जी मांडलेली आहे ती भूमिका योग्य आहे; असे म्हटले आहे. मुस्लिम देखील आपलेच बांधव आहेत आणि त्यांचा भावनांचा विचार करणे गरजेचे आहे, असे ही स्पष्ट मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

“मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. राम जन्मभूमीच्या प्रश्नासाठी अनेक वर्ष लढा सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून यात यश मिळाले आहे. सध्या राम जन्मभूमीवर जोमाने काम सुरू आहे. प्रत्येक मशिदीमध्ये पिंड अशा पद्धतीचा इतिहास खरा आहे. एक वेळ अशी होती की, आपला सगळा देश बुद्धिस्ट होता. त्यानंतर हिंदू झाला. त्यानंतर मुघल आले आणि हिंदू लोक मुस्लिम झाले. त्यामुळे काही ठिकाणी मंदिर होती त्या ठिकाणी मशिदी आल्या आहेत ही गोष्ट खरी आहे. पण आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करायचा असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये वाद निर्माण करणे योग्य नाही. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली ती योग्य असून प्रत्येकाने इतिहास उकरून काढण्याची गरज नाही. मुस्लिम देखील आपले बांधव आहेत आणि त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे,” अशी रोखठोख भूमिका तले यांनी मांडली.

मोहन भागवत काय म्हणाले होते ?

मोहन भागवत यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “सध्या ज्ञानवापीचा मुद्दा सुरू आहे. एक इतिहास आहे, तो आपण बदलू शकत नाही. ना आजच्या हिंदू लोकांनी तो बनवला, ना आजच्या मुसलमान लोकांनी बनवला. त्यावेळी तो इतिहास घडला. आम्ही काही खास प्रतिकात्मक ठिकाणांबद्दल भूमिका घेतली. पण रोज एक केस वर काढता कामा नये. आम्हाला भांडण वाढवायचे नाही. ते म्हणाले की इस्लाम बाहेरून आले, आक्रमकांच्या माध्यमातून ते आले. त्यावेळी ज्यांना भारताचे स्वातंत्र्य हवे होते त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी त्यांनी देवस्थाने पाडली.”

भागवत म्हणाले की, “हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाहीत. आजच्या मुस्लिमांचे पूर्वजही हिंदूच होते. मनात काही मुद्दे असतील तर ते निर्माण होतील. ते कोणाच्या विरोधात नाही. परस्पर संमतीने मार्ग काढा. मार्ग न मिळाल्यास लोक न्यायालयात धाव घेतात. काहीही झाले तरी न्यायालयाचा निर्णय मान्य करायला हवा. आपली न्यायव्यवस्था पवित्र आणि सर्वोच्च मानून आपण निर्णयांचे पालन केले पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!