मुंबई : ‘आश्रम ३’ च्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी खूप जास्त प्रेम दिले आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. नुकताच या वेबसीरीजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये अभिनेत्री अनुरिता झा हिने बरेच बोल्ड सिन दिले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीमध्ये अनुरीताने बोल्ड सिन शूटपूर्वी तिच्या वडिलांना विचारले असता वडिलांनी प्रतिक्रिया काय दिली होती? याचा खुलासा तिने मुलाखतीत केला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “मी माझ्या कुटुंबीयांना सुरुवातीलाच सांगितलं होतं. त्यामुळे मी यासाठी खूपच उत्सुक आहे. माझ्यासाठी हे सर्व करण्याची ही पहिलीच वेळ होती. माझ्या करिअरमध्ये मी पहिल्यांदाच असे इंटीमेट सीन दिले आहेत. पण असं करण्याआधी मी माझ्या बाबांना फोन केला होता. त्यांना मी विचारलं होतं की, बाबा हे असं होणार आहे तर मी हे करावं असं तुम्हाला वाटतं का? त्यावर ते मला म्हणाले, हो तू बिनधास्त करू शकतेस. याशिवाय यामध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यामुळे देखील असे सीन शूट करणं अधिक सोपं गेलं कारण त्यांनी मला सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या होत्या.”
ईशाने देखील बोल्ड सीनच्या शूटवेळीचे अनुभव केले शेअर –
एका मुलाखतीमध्ये ईशाने देखील शूटच्या वेळीचे अनुभव सांगितले. ईशा म्हणाली, “असे सीन करताना कम्फर्टेबल असण्याचा किंवा नसण्याचा काही प्रश्न नाही. जेव्हा तुम्ही १० वर्षं या क्षेत्रात काम करत असता तेव्हा असे सीन शूट करताना तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका नसते. मोठ्या पडद्यावर इंटिमेट सीन बऱ्याच लोकांना खूप मोठी गोष्ट वाटते. पण याबाबतीत मी खूप मोकळ्या विचारांची व्यक्ती आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

