🕒 1 min read
परळी : भाजप नेते व लोक नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांची गोपीनाथ गडावर उपस्थिती महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी आहे. यावेळी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
शिवराजसिंह चौहान म्हणाले की, आज मी भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणून इथे उपस्थित झालेलो नाही, तर नेते गोपीनाथ मुंडे हे माझे मोठे बंधू होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी गोपीनाथ गडावर आलो आहे. पंकजा मुंडे या बड्या नेत्या आहेत. पंकजांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण मध्य प्रदेश सरकार काम करत आहे. मध्य प्रदेशात त्या खूप चांगलं संघटनात्मक कार्य करतात. मी जसा मध्य प्रदेशचा मामा आहे तसा महाराष्ट्राचाही मामा आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी माझं खूप जवळच नातं आहे. मी महाराष्ट्राचा जावईही आहे. त्यामुळे जोपर्यंत श्वास चालू असेल, तोपर्यंत आपलं नातं ही कायम राहील.
सध्याच्या घडीची सर्वात मोठी बाबा म्हणजे ओबीसी आरक्षणावर बोलताना शिवराज सिंह चौहान यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर मनात निश्चय असेल, संकल्प असेल, हृदयात तडफ असेल तर उद्धव ठाकरेजी ओबीसी आरक्षणावर नक्कीच मार्ग निघेल. मी स्पष्ट भूमिका घेतली होती की, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत. कुणी साथ दिली किंवा नाही दिली तरी आम्ही मात्र ओबीसी आरक्षणाची खिंड लढवली. तिहेरी परीक्षणाच्या आधारावर ओबीसी आरक्षणाची ही जटील प्रक्रिया पूर्ण केली, असे म्हणत शिवराज सिंह चौहान यांनी ठाकरे सरकारला घेरले.
‘मी लहान मुलींची नेहमी पूजन करतो. मी जे काही करतोय ते योग्यच करतोय, हे आज या तीन मुलींकडे पाहून वाटतं. गोपीनाथ गडावर येऊन मला मुली मुलांपेक्षा मोठ्या असतात हे स्पष्ट कळलं. किती प्रतिक्षा केली असेल या मातीने की, गोपीनाथ मुंडे मंत्रीपदी विराजमान होऊन येथे पोहचतील. पण दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे दुसऱ्या जगात निघून गेले. ३ जून आपल्यासाठी काळा दिवस आहे, अशा भवन शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केल्या.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
