मुंबई : भारतीय वेगवान गोलंदाज उमरान मलिकने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयपीएल दरम्यान उमरान मलिकच्या गोलंदाजीची चर्चा चाहत्यांच्या मुखातून हमखास ऐकायला मिळाली. यंदाच्या मोसमातील त्याच्या चमकदार कामगिरीनंतर निवडकर्त्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. उमरान मलिकबाबत जगभरात त्याच्या वेगवान गोलंदाजीची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानी संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला उमरान मलिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याचे उत्तर काही वेगळे होते.
युवा वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक वेगाने उदयास येणारे नाव भारतीय गोलंदाज उमरान मलिकचे आहे. त्याचा वेगवान गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीपासून पाकिस्तानच्या शोएब अख्तरपर्यंत सर्वांना भुरळ घातली आहे. भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतर आता त्याची खरी परीक्षा सुरू होणार आहे. पाकिस्तान संघाचा गोलंदाज शाहीनने उमरान मलिकसारखीच आपली ओळख निर्माण केली होती आणि आज तो पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.
उमरान मलिकबाबत शाहीनला विचारले असता त्याने उत्तर दिले, “जर तुमच्याकडे लाइन, लेंथ आणि स्विंग नसेल तर तुमची गती तुम्हाला मदत करू शकत नाही.”
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अख्तर म्हणाला होता की, जर उमरान मलिकला योग्य प्रशिक्षण मिळाले तर तो क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रमही मोडू शकतो. उमरान मलिकने हा विक्रम मोडला तर त्याला खूप आनंद होईल, असेही अख्तरने म्हंटले होते. त्याने उमारान मलिकला सल्लाही दिला होता की, वेगवान गोलंदाज असल्याने दुखापतीपासून दूर राहून जपून मालिकेत खेळावे. उमरान भविष्यातील स्टार खेळाडू असल्याचे सांगत अख्तरने बीसीसीआयला त्याच्यावरील ताण सांभाळण्यास सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या:


