मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना, आज बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेची सुरुवात भारतीय संघासाठी चांगली झाली नव्हती. भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. सुरूवातीला दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. पण यानंतर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दोन सामने जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. आता या मालिकेतील शेवटचा सामना या मालिकेचा विजेता ठरवेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. तेव्हा वाटले की या वर्षी दक्षिण आफ्रिकेला मालिकेत हरवणे भारतीय संघासाठी अशक्य राहील. पहिल्या दोन सामन्यात कडे पाहिले तर भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब होती. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे अपयश आले होते. तर दुसर्या सामन्यात भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. पण यानंतर पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुढील दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना जे जमले नाही ती कामगिरी करण्याची संधी ऋषभ पंतकडे आहे. चाहत्यांनाही आशा लागली आहे की भारत या मालिकेत विजय मिळवून इतिहास घडवेल. भारतीय संघ सध्या मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारताने ही मालिका जिंकल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका मायदेशात जिंकण्याची ही पहिलीच वेळ असेल.
Rajkot ✈️ Bengaluru
Excitement levels ???? for the final @Paytm #INDvSA T20I. ???? ????#TeamIndia pic.twitter.com/7DirHt49sG
— BCCI (@BCCI) June 19, 2022
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्करावा लागला
दक्षिण आफ्रिकेने २०१५ साली भारतात पहिली टी-२० मालिका खेळली होती. त्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेने धर्मशाला येथील पहिला टी-२० आणि कटकमधील दुसरा टी-२० सामना जिंकला होता. तर कोलकाता येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता.
कोहलीच्या नेतृत्वातही भारताला यश मिळाले नाही
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०१९ मध्ये भारत दौऱ्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली गेली होती. यावेळीही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करू शकला नाही. धर्मशाला येथील मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला. यानंतर भारतीय संघाने मोहाली येथे झालेला दुसरा टी-२० सामना जिंकला होता. तर पाहुण्या संघाने बंगळुरूमधील तिसरा सामना जिंकला. अशाप्रकारे मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली आणि आफ्रिकेला मायदेशात पराभूत करण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले होते. मात्र आता रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात पंतच्या नेतृत्वाखाली भारताला हा इतिहास बदलण्याची संधी असेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

