Share

“…हाच दृष्टीकोन मराठी शाळांबाबत आहे का?”, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  आज १९ जूनरोजी शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील पवईत वेस्टीनमध्ये असल्याने शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होणार आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान यानिमित्त भाजप आमदार अमित साटम यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मराठी भाषेला उतरती कळा लागल्याचे म्हटले आहे.

“स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळे लावण्यात येत आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच दृष्टीकोण सत्ताधारी सेनेचा मराठी शाळांबाबत आहे का? असा सवाल अमित साटम यांनी केला आहे.

गेल्या १० वर्षात ११० मराठी शाळांना टाळे लागले आहे. ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आली. एकीकडे  सेना मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगते तर दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांनी घसरत आहे. असे अमित साटम यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!