🕒 1 min read
मुंबई : लष्करातील सैन्यभरतीबाबतच्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) आता देशभरातून विरोध होत आहे. या योजनेवरून देशात सर्वत्र गदारोळ सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी सैन्य भरती अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. एका राज्याचे पडसाद दुसऱ्या राज्यातही उमटत आहेत. देशाच्या विविध भागात विद्यार्थ्यांकडून निदर्शने होत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आता यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने सरकारची बाजू घेत अग्निपथ योजनेचा विरोध करणाऱ्यांवर भडकली आहे.
कंगनाने सरकारच्या या योजनेला पाठिंबा दिला आहे. याबाबत तिने तिच्या इंस्टाग्रामवरून (Instagram) पोस्ट शेअर केली. पोस्ट शेअर करत कंगना म्हणाली, “इस्रायलसारख्या देशांमध्ये आपल्या तरुणांना लष्कराचं प्रशिक्षण घेणं जरुरीचं केलं आहे. प्रत्येक जण काही वर्ष तरुणांना लश्कर प्रशिक्षण देतं. त्यामुळे शिस्त, राष्ट्रवाद आणि देशाच्या सीमेचं संरक्षण करण्याचं महत्त्व कळतं. अग्निपथ योजनेचा उद्देश फक्त करिअर करणं, पैसे कमावणं नाही. त्यापेक्षाही ते सखोल आहे.” कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

पुढे देखील कंगना म्हणाली, “पूर्वी प्रत्येक व्यक्ती गुरुकुलमध्ये जात असत आणि हे देखील त्यासारखंच आहे. याचे पैसे देखील मिळणार आहे. ड्रग्ज पबजी यासारख्या गोष्टींमुळे आत्ताची पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे आता अशा योजनांची गरज आहे. या योजनेसाठी सरकारचे कौतुक केले पाहिजे”.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
