🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. तर राष्ट्रपती निवडणुकीसाठी बिग बॉस फेम व कवी मनाचे नेते अशी ओळख असलेले साताऱ्याचे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यासाठी ते आवश्यक आमदार आणि खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यातच आता अभिजित बिचुकले यांनी एक मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन बिचुकले यांनी केले आहे.
“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल”, असं बिचुकले म्हणाले आहेत. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीअध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल. शरद पवारांचं सर्व आमदार ऐकतात. मला आमदारांच्या सह्या मिळतील आणि पाठिंबा मिळेल. यामुळे माझा राष्ट्रपती होण्याचा मार्ग सोपा होईल. मी राष्ट्पती होऊ शकतो”, असं बिचुकले म्हणाले आहेत.
अभिजीत बिचुकले हे आपल्याला बिग बॉस मराठीच्या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांच्या बोलण्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते. यानंतर बिचुकले बिग बॉस हिंदीच्या १५ व्या सिझनमध्येही दिसले होते. बिचुकले यांनी यापूर्वीही अनेक निवडणुका लढवल्या आहेत. शिवसेना नेते व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधातही त्यांनी मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हाही ते पराभूत झाले होते. अनेकदा अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आहे. शिवाय उदयनराजे भोसले यांच्या विरोधातही निवडणूक लढवली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “तरुणांचे भविष्य उद्धवस्त करणारी…”, बाळासाहेब थोरात यांचा केंद्रावर निशाणा
- Agnipath Scheme: “महाराष्ट्रात एस.टी. आंदोलन चिघळवणारे आता…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा
- केवळ लैंगिक सुखासाठी वेश्यालयात जाणे गुन्हा नाही; कोलकाता हायकोर्टाचा निकाल
- 56 वर्षाचा झंझावात! शिवसेनेच्या वर्धापनदिनी संजय राऊतांचे ट्वीट
- Agnipath Scheme: “शक्तिशाली भारत कधीही नको असलेल्या…”, पी. चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
