मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे संघाला मालिकेत पुनरागमन करता आले. पण कर्णधार ऋषभ पंतचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. पुन्हा एकदा तो केवळ ६ धावा करू शकला. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी ऋषभ पंतच्या सततच्या फलंदाजीतील अपयशाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
गावसकर म्हणाले की, पंतला आपल्या फलंदाजीचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पंतच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर तो आयपीएलमध्येही संघर्ष करताना दिसला होता. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याची बॅट शांत आहे. भारतीय संघाने ‘करो या मरो’ च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४८ धावांनी दणदणीत विजय नोंदवून मालिकेतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
ते म्हणाले की, ‘सामना जिंकल्यानंतर पंतला दोन दिवस त्याच्या फलंदाजीचा विचार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्याने आत्मपरीक्षण करावे की आपल्या फलंदाजीत चूक कोठे होत आहे?’ गावसकर पुढे म्हणाले की, “लोकांची इच्छा आहे की त्याने यावे आणि मोठे शॉर्ट्स खेळावे आणि चौकार-षटकार मारावेत. याचे कारण असे की त्याने गेल्या ३-४ वर्षांत अशीच फलंदाजी केली आहे. कर्णधारपदामुळे कधीकधी आपण आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत नाही. तुम्ही बाकीच्या गोलंदाजांचा आणि फलंदाजांचा विचार करा आणि तुमच्या फलंदाजीतील तांत्रिक त्रुटींकडे लक्ष देत नाही. त्याला त्याच्या फलंदाजीचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. संघांच्या विजयाने त्यांच्यावरील दडपण थोडे हलके झाले आहे. त्यामुळे त्याला त्याच्या फलंदाज इकडे लक्ष देण्यास वेळ आहे. तू तुझ्या फलंदाजीचा विचार करायला हवा.” गावसकर यांनी पंतला खराब शॉर्ट्स खेळण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला कारण या चुकांमुळे त्याची फलंदाजी सतत खराब होत चालली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील चौथा टी-२० सामना १७ जूनला राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारताने विशाखापट्टणम येथे खेळायला तिसरा सामना जिंकून मालिकेत २-१ असे पुनरागमन केले आहे. अजूनही भारतासाठी प्रत्येक सामना हा ‘करो या मरो’ स्थितीचा असणार आहे. भारताला ही ५ सामन्यांची टी-२० मालिका जिंकण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. सलग तिसऱ्या सामन्यातही भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणताही बदल केला नव्हता. राजकोट येथील चौथ्या सामन्यातही भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरू शकतो.
महत्वाच्या बातम्या:


