Share

“राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा…”; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावरती आहेत. शिवसेनेचे काही निवडक नेते वगळता इतर आमदारांना अयोध्या दौऱ्यावर जाता येणार नाही. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही सावध भूमिका घेतली आहे. या अयोध्या दौऱ्यावर आता फक्त शिवसैनिकच आदित्य ठाकरेंच्या सोबत असतील, तर आमदारांना दौऱ्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. याच दरम्यान आता मनसेने आदित्य ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

“काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्यावेळी आस्वाद घेत असतील” अशा शब्दात देशपांडे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “सेटिंग करून दौरा आणि हिंमत असणं यातला फरक आहे” असं म्हणत मनसेने टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. “आज एक जुनी गोष्ट आठवली जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेल सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील. फक्त राजसाहेबच तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिंमत असणं यातला फरक आहे” असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.

मनसेने याआधीही अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. “रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो” अशी तुका केली होती. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!