Share

दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० मालिकेसाठी पोहोचला दिल्लीत, भारतीय संघाचे होणार ५ जूनला आगमन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे. गुरुवारी सकाळी आफ्रिकेचा संघ दिल्लीला पोहोचला जिथे पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही देशांदरम्यान ५ सामन्यांची टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर ऋषभ पंतला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेतून रोहितशिवाय जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

आफ्रिका विरुद्धच्या मालिकेतून दिनेश कार्तिक, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याचे संघात पुनरागमन झाले आहे. या खेळाडूंनी आयपीएलमध्ये आपापल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. हार्दिकने आपल्या कर्णधारपदाखाली गुजरात संघाला पहिल्याच सत्रात आयपीएल चॅम्पियन बनवले.

या मालिकेद्वारे सनरायझर्स हैदराबादसाठी शानदार गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि पंजाबकडून गोलंदाजी करणारा अर्शदीप सिंग पदार्पण करणार आहे. दोघांचा पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ जूनपासून सराव सुरू करणार आहे. मात्र, या काळात संघाला दररोज कोरोना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे.

भारतीय संघ ५ जूनला दिल्लीत पोहोचणार आहे. जे खेळाडू आयपीएलमधील क्वालिफायर सामन्यांचा भाग होते ते उशीरा संघात सामील होतील. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता भारतीय संघाला मागील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

महत्वाच्य बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!