Share

भारतीय क्रिकेट संघ जुलैमध्ये जाणार वेस्ट इंडिज दौऱ्यावर; जाणून घ्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टी-२० विश्वचषकापूर्वीही मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा थरार कायम राहणार आहे. भारतीय संघ ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. भारताचा हा दौरा थोडा लांबणीवर टाकण्यात आला आहे. २२ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात संघ ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेव्यतिरिक्त ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट आणि बीसीसीआयने या दौऱ्याबाबत माहिती दिला आहे. एकदिवसीय मालिका आणि टी-२० सामने त्रिनिदाद, टोबॅगो, सेंट किट्स आणि नेव्हिस येथे आयोजित केले जातील तर शेवटचे दोन टी-२० सामने फोर्ट लॉडरहिल आणि फ्लोरिडा येथे आयोजित केले जातील.

३ एकदिवसीय सामने
पहिली वनडे – २२ जुलै, क्वीन्स पार्क ओव्हल
दुसरी वनडे – २४ जुलै, क्वीन्स पार्क ओव्हल
तिसरी वनडे – २७ जुलै, क्वीन्स पार्क ओव्हल

५ सामन्यांची टी-२० मालिका
पहिला सामना – २९ जुलै, ब्रायन लारा स्टेडियम
दुसरा सामना – १ ऑगस्ट, वॉर्नर स्टेडियम
तिसरा सामना – २ ऑगस्ट, वॉर्नर स्टेडियम
चौथा सामना – ६ ऑगस्ट, फोर्ट लॉडरहिल
पाचवा सामना – ७ ऑगस्ट, फोर्ट लॉडरहिल

आगामी मालिकेबाबत, वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन म्हणाला की, “आम्ही एक युवा संघ आहोत आणि वेस्ट इंडिज इथून मागे खेळत असलेला क्रिकेटचा ब्रँड पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू.” तो पुढे म्हणाला, “मी या संघाची जबाबदारी स्वीकारल्यापासून माझे एकमेव ध्येय म्हणजे नेहमीच स्पर्धात्मक राहणे हेच राहिले आहे. कारण आम्हाला या मालिकेचा उपयोग आगामी टी-२० आणि ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची तयारी सुधारण्यासाठी करायचा आहे.”

विश्वचषकापूर्वी भारताला संधी
भारतीय संघाला टी-२० विश्वचषकापूर्वी १५ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेत संघाला आपली तयारी मजबूत करण्याची संधी असणार आहे. जेणेकरून ते त्यांच्या उणिवांवर काम करू शकतील आणि विश्वचषकात परिपूर्ण संघासह मैदानात उतरतील.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!