Share

राज्यात पुन्हा मास्कसक्ती? रूग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची बैठक!

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वादात आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात येईल, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषेदेत केले होते. त्यातच एक आता मोठी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर तातडीने टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी ६ वाजता हि बैठक पार पडेल. जर रुग्णसंख्या वाढत राहिली तर मास्क सक्ती करण्यात येईल, असे अजित पवार बोलले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

कोरोनाच्या तिन्ही लाटेत लोकांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या कोरोना रुगसंख्येवर राज्य सरकारची तसेच इतर सर्व यंत्रणांचे लक्ष आहे. आज जनता दरबार कार्यक्रमास उपस्थित राहिले असता, अजित पवार यांनी हि माहिती दिली.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातले आहे. मटार काही महिन्यातच कोरोची आकडेवारी कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आता कोरोनाची आकडेवारी पुन्हा एकदा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत आणि एकूणच राज्यात आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काही कठोर निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात. मास्क सक्तीबाबतही मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात कोरोना नियम शिथिल केल्याने सार्वजनिक ठिकाणी पुन्हा गर्दी वाढली. आता मात्र पुन्हा काही निर्बंधांना सामोरे जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!