Share

राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश, आता भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा…

Published On: 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून मशीदीवरील भोंग्याविरोधात आक्रमक घेतली आहे. भोंगा हा धार्मिक विषय नसून तो सामाजिक विषय आहे असे राज ठाकरे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते. भोंग्यांविरोधात हनुमान चाळीस आंदोलन चालवण्यात आले. यावरून राज्यात बराच राजकीय वाद रंगला. मनसैनिकांनी धरपकड झाली. हजारो मनसैनिकांना पोलिसांच्या नोटीसा गेल्या. यानंतर बरंच राजकीय वातावरण ढवळून निघालं.

मात्र आता राज ठाकरे यांनी एक पत्र सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. मनसे सैनिकांना पत्राद्वारे राज ठाकरे यांनी नवे आदेश दिले आहे. भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे पत्राद्वारे घराघरात पोहोचा, त्याशिवाय आंदोलन यशस्वी होणार नाही, असे पत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे.

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात, मशीदीवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.

मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, अशा आशयाचे पत्र त्यांनी कार्यकर्त्यांना आता पाठवलं आहे

 

मात्र आता राज ठाकरे यांनी एक पत्र सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. मनसे सैनिकांना पत्राद्वारे राज ठाकरे यांनी नवे आदेश दिले आहे. भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे पत्राद्वारे घराघरात पोहोचा, त्याशिवाय आंदोलन यशस्वी होणार नाही, असे पत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!