Share

IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या पराभवाची आहेत ‘ही’ तीन मुख्य कारणं; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पहिला टी-२० सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी होती. पण संघाला २११ धावांसारख्या मोठ्या धावसंख्येचा बचावही करता आला नाही. त्यामुळे सलग १२ विजयांचा प्रवास अखेर दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर थांबला. नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघासाठी सर्व काही ठीक झाले. आयपीएलच्या खराब कामगिरीला मागे टाकत इशान किशनने संघाला चांगली सुरुवात करून दिली. यामुळे संघ निर्धारित षटकात ४ गडी गमावून २११ धावा करू शकला. परंतु गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकाच्या फलंदाजास समोर शरणागती पत्करली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने भारताच्या भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला आणि ५ चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखून सामना जिंकला. भारतीय संघाच्या या पराभवात त्या तीन खलनायकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ही तीन नावे आहेत श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल.

१६व्या षटकात जेव्हा आवेश खान गोलंदाजी करायला आला होता. तेव्हा दुसऱ्याच चेंडूवर रासी व्हॅन डर डूसेनने मिड-विकेटवर एक शॉट खेळला. चेंडू तेथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या अय्यरच्या हातात गेला पण तो पकडण्यात अपयश आले. त्यावेळी डूसेन केवळ ३२ चेंडूत ३० धावांवर खेळत होता. मात्र त्यानंतर त्याने ४६ चेंडूत ७५ धावांची स्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकाने ४ षटकांत १ गडी बाद ४२ धावा केल्या होत्या. गडी बाद करण्याच्या शोधात पंतने आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याकडे चेंडू सोपवला. पण त्याचे हे षटक संघासाठी महागडे ठरले. प्रिटोरियसने त्याच्या या षटकात ३ षटकार ठोकले आणि येथून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामन्यात पुनरागमन केले.

दिल्लीची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जाते. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकाचा गोलंदाज केशव महाराजलाही मदत मिळत होती. पण आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणाऱ्या चहलला पंतने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीस बोलवले त्याच्या या षटकात १६ धावा गेल्या. त्यानंतर संपूर्ण सामन्यात चहलने फक्त दोनच षटक पूर्ण गोलंदाजी केली.

दुसरा टी-२० सामना १२ जून रोजी कटक येथे खेळवला जाईल. आयपीएलमधील डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंगचा त्या सामन्यात समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय पहिल्या टी-२० सामन्यातील चुकांमधूनही संघाला धडा घ्यावा लागेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!