Share

अमृता फडणवीस ‘या’ चित्रपटासाठी गाणार रोमँटिग साँग; ट्वीट करत म्हणाल्या…

Published On: 

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या उत्तम गायन कलेसाठी प्रसिद्ध आहेत. नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा आपल्या आवाजाची जादू दाखवणार आहेत. एका चित्रपटासाठी त्या रोमँटिग साँग गाणार आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

पंडित ललित यांचं संगीत, संजय चेल यांचे गीत आणि पटकथा असणारा ‘लव्ह यू लोकतंत्र’ या चित्रपटासाठी अमृता फडणवीस गाणे गाणार आहे. “गायक शान यांच्यासोबतच्या माझ्या रोमँटिक गाण्याच्या स्क्रीनिंगच्या वेळची छायाचित्र. हे गाणं विनोदी राजकीय टिप्पणी असणारा आगामी चित्रपट ‘लव्ह यू लोकतंत्र’ मधील आहे. हा चित्रपट ऑगस्ट २०२२मध्ये रिलीज होणार आहे”, असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान यावेळी अमृता फडणवीस यांनी चित्रपटातील टीम सोबतचे फोटोही पोस्ट केले आहेत. यामध्ये गायक शान दिसून येत आहे. आता अमृता फडणवीस यांच्या गाण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्या या पोस्टला अनेक लाईक्स आणि कमेंट्सही मिळताना दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!