मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत खरी लढत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून अपक्ष उमेदवारांना खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निकालावरून कळेल. या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्यावर सर्वांचे लक्ष होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही मागण्या केल्या होत्या. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर मतदान न करण्याचा त्यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला होता. दरम्यान आज सर्वात शेवटी बच्चू कडू यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बच्चू कडू यांना नाराजी दुर झाल्यामुळे तुमचे मत महाविकास आघाडीला का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मत कुणाला सांगत नसतात. आमच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जो सेक्टरवर हरभरा आहे. तो सर्व खरेदी होणार. जो ऑनलाइन राहीलेला आहे. केंद्राने प्रस्ताव पाठवला असून त्यालाही मंजुरी मिळाली आहे. नाराजी माझी नव्हती शेतकऱ्यांची होती, त्यामुळे आम्ही इशारा दिला होता”.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक. दुसरीकडे शिवसेनेकडे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत 42 मतांऐवजी विजयासाठी 41 मतांची गरज आहे. कारण अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदान करता येणार नाही. तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

