Share

राज्यातील १० कोटी लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद; छगन भुजबळांची माहिती

Published On: 

मुंबई: महाविकास आघाडीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीने एक महत्वपूर्ण टप्पा पार केलेला आहे. राज्यातील १० कोटी लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. हा आकडा पाहून शिवभोजन थाळी सुरू करण्यामागचे उद्दिष्ट साद्य होताना दिसत आहे. अशी माहिती राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

“लोकाभिमुख योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात असल्याने मला समाधान आहे.”, असे छगन भुजबळ यांनी ट्वीट करत म्हटले आहे. दरम्यान राज्यातील गरीब व कष्टकऱ्यांना एकवेळचे जेवण अत्यल्प दरात मिळावे, यासाठी राज्य सरकारने २०२० रोजी शिवभोजन योजना सुरू केली होती. या योजनेतून गरीब व कष्टकऱ्यांना दहा रुपयांत पोटभर जेवण मिळते.

शहरातील रुग्णालये, बसस्थानके, शासकीय कार्यालये, बाजारपेठेची ठिकाणे या ठिकाणी ही शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या योजेनेन आज एक महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!