🕒 1 min read
मुंबई : भारताचा युवा फलंदाज इशान किशनने दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीचा फायदा आयसीसी टी-२० रँकिंग मध्येही पाहायला मिळाला आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-२० रँकिंगमध्ये त्याने तब्बल ६९ स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसीच्या टी-२० रँकिंगमधील पहिल्या १० खेळाडूंमध्ये इशान किशन हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो सध्या या यादीत सातव्या स्थानावर आहे.
इशान किशन ने साऊथ आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु पॉवरप्लेमध्ये त्याच्या संथ खेळीवर माजी खेळाडू ने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मालिकेत इशान किशनने दोन अर्धशतकांच्या मदतीने १६४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १५७.६९ असा राहिला आहे. तथापि, जर आपण पॉवरप्लेच्या आकडेवारीबद्दल बोललो तर, या फलंदाजाने सध्याच्या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये एकूण ५८ चेंडू खेळले आहेत. यामध्ये त्याने केवळ ६८ धावा केल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये त्याचा स्ट्राइक रेटही केवळ १२५.९२ असा राहिला आहे. ज्यावरून स्पष्टपणे दिसून येते की सुरुवातीच्या षटकांमध्ये इशान धावा काढण्यासाठी वेळ घेतो.
मांजरेकर यांना वाटते की, हा डावखुरा फलंदाज पॉवरप्लेमध्येच बाद झाला तर तो धावा करण्यासाठी खेळलेले जास्त चेंडू वाया घालवतो. मांजरेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इशान किशनला पॉवरप्लेचा फायदा घेत सुरुवातीपासूनच आक्रमक पध्दतीची फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “पहिल्या २० धावांसाठी ईशान किशन गोलंदाजांसमोर झुंजताना दिसतो. त्याचबरोबर सुरुवातीच्या काही धावांसाठी तो जास्त चेंडू खेळतो. इशान जर २० चेंडूत २० धावांवर बाद झाला तर? मग तुमच्या संघाला वाईट वाटेल कारण पॉवरप्लेमधील २० चेंडू गेले आहेत आणि तुम्ही त्यांचा फायदा घेऊ शकत नाही. इशान किशन माने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करावी. त्यामुळे संघातील पुढच्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजांवर दबाव येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे माझा इशान किशनला सल्ला आहे की, जर तुम्हाला पहिल्या २० चेंडूंमध्ये वेगवान धावा करता येत असतील तर करा. टी-२० मध्ये १० गडी पुरेसे असतात.
Josh Hazlewood claims No.1 spot????
Ishan Kishan gallops into top 10 ????
Glenn Maxwell, Wanindu Hasaranga gain ????Plenty of ???????? in the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings ???? https://t.co/ebcusn3vBT pic.twitter.com/dyQVqkmRPG
— ICC (@ICC) June 15, 2022
या मालिकेत सध्या दक्षिण आफ्रिका संघ २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना आज राजकोट येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. मालिकेतील चौथा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय संघात वेगवान गोलंदाज आवेश खानच्या जागी बदल होण्याची शक्यता सांगितली जात आहे. तर दक्षिण आफ्रिका संघात क्विंटन डी कॉक ची वापसी होण्याचे संकेत आहेत. याव्यतिरिक्त दोन्ही संघात कोणतेही बदल होण्याची शक्यता कमी आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
