Share

IND vs SA : वेगवान गोलंदाज आवेश खानची खराब कामगिरी, चौथ्या सामन्यासाठी संघात होऊ शकतो बदल

Published On: 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चौथा सामना आज राजकोट येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खानची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. मागील खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही.

माजी सलामीवीर आकाश चोप्राने आवेश खानवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत आवेश खानची कामगिरी चांगली झाली नसल्याचे त्याने म्हटले आहे. त्याला एकही बळी घेता आलेला नाही आणि त्यामुळेच त्याला चौथ्या टी-२० सामन्यातून वगळले जाऊ शकते. आवेश खानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र आतापर्यंत त्याला एकही बळी मिळवता आलेला नाही. त्यावबरोबर त्याचा इकॉनॉमी रेट ७.९० असा राहिला आहे. पहिल्या सामन्यात त्याला बळी मिळू शकला असता पण श्रेयस अय्यरने त्याच्या चेंडूवर रेसी व्हॅन डेर ड्युसेनचा झेल सोडला होता. त्यानंतर मात्र आवेश खान बळी मिळविण्यात अपयशी ठरला आहे.

आवेश खानच्या जागी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता

आकाश चोप्राच्या मते, चौथ्या टी-२० सामन्यातून आवेश खानला वगळल्याची चर्चा होत आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या संवादादरम्यान तो म्हणाला की, ‘भारतीय संघाच्या गोलंदाजीत काही बदल होऊ शकतो का? आवेश खानला आतापर्यंत एकही बळी मिळालेला नाही. तुम्ही कदाचित संघात येथे बदल करू शकता. तरीही तुम्हाला काय हवे आहे यावर अवलंबून आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना १७ जूनला राजकोट येथे खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव करून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजयासह पुनरागमन केले आहे. अशा स्थितीत चौथ्या सामन्यात अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळेल. भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधायची संधी आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान/ अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ड्वेन प्रिटोरियस, रासी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!