🕒 1 min read
मुंबई : ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनित ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल १४ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाला एवढं प्रेम दिल्याबद्दल कार्तिकने चाहत्यांचे आभार मानले आहेत. आता या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्तिक आर्यनने एनजीओच्या मुलांसाठी खास स्क्रीनिंग आयोजित केले आहे.
एनजीओच्या मुलांसोबतचे कार्तिक आर्यनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये कार्तिक पहिल्यांदा थिएटरच्या बाहेर आणि नंतर स्क्रीनिंग दरम्यान मुलांसोबत पोज देताना दिसत आहे. याचवेळी ‘भूल भुलैया २’ चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी कार्तिक आणि मुलांसोबत स्क्रीनिंगला हजेरी लावली होती.
https://www.instagram.com/p/Ce3vxd7DSCr/
कार्तिकच्या ‘भूल भुलैया २’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा एक हॉरर, कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यनने अप्रतिम काम केले आहे. कार्तिक व्यतिरिक्त या चित्रपटात कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा सारखे कलाकार होते. या चित्रपटाने आतापर्यंत १७१ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
