मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीमुळे बऱ्याच भारतीय खेळाडूंना पुना संघामध्ये स्थान मिळाले आहे. आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेसाठी निवडकर्त्यांनी निवडलेल्या संघात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप यांना संधी मिळालीआहे. तर हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांनी संघात पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या हार्दिक पंड्याने आयपीएलच्या या मोसमात चमकदार कामगिरी केली. त्याने कर्णधारपद भूषविताना गुजरात संघाला स्पर्धेचा चॅम्पियन बनवले. त्याने यंदाच्या हंगामात गोलंदाजी तसेच फलंदाजीमध्ये संस्मरणीय कामगिरी करून अंतिम सामन्यात सामनावीर देखील ठरला.
राहुलच्या नेतृत्वाची कसोटी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरेलु टी-२० मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात एक राहुलने फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली आहे. लखनऊ सुपर जायंट्स या नवीन फ्रँचायझीसाठी कर्णधारपदाच्या भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे. हंगामात त्याने २ शतकांसह ६१६ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिला.
दिनेश कार्तिक कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
प्रदीर्घ कालावधीनंतर दिनेश कार्तिकला त्याच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने शानदार खेळ दाखवला. यंदाच्या हंगामातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार त्याला सांगत स्थान मिळाल्याने प्राप्त झाला.
अर्शदीपच्या युवा कौशल्यावर सर्वांचे लक्ष
२३ वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या शानदार यॉर्करने सर्वांना प्रभावित केले आहे. अर्शदीपने या हंगामात पंजाब किंग्जकडून सातत्याने उत्कृष्ट गोलंदाजी केल्याने निवडकर्त्यांनी त्याचीही या मालिकेसाठी निवड केली आहे. त्यामुळे चाहत्यांचे या मालिकेकडे आतूरतेने लक्ष लागलेले असणार आहे. कारण या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडू तसेच पुनरागमन केलेल्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. तर दुसरीकडे या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

