मुंबई: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लाडक्या लालपरीचा आज वर्धापनदिन. गेल्या ७४ वर्षांत एसटीने महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सुरक्षित प्रवासाचे ध्येय एसटी महामंडळाने सदैव जपत प्रवाशांची सेवा केली आहे. असे ट्वीट राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना हिरकणी, शिवशाही, विठाई अशी अनेक रूपे बदलली आहेत. आज वर्धापनदिनीदेखील एसटी ‘शिवाई’ या नव्या रूपात दाखल होत आहे. शिवाई या नव्या रूपात नागरिकांना सेवा देताना पर्यावरण रक्षणाचे भान ठेवत संपूर्ण इलेक्ट्रिक रूपात चालविण्यात येणार आहे. अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना हिरकणी, शिवशाही, विठाई अशी अनेक रूपे बदलली आहेत. आज वर्धापनदिनीदेखील एसटी 'शिवाई' या नव्या रूपात दाखल होत आहे. शिवाई या नव्या रूपात नागरिकांना सेवा देताना पर्यावरण रक्षणाचे भान ठेवत संपूर्ण इलेक्ट्रिक रूपात चालविण्यात येणार आहे. @satejp
— Anil Parab (@advanilparab) June 1, 2022
महाराष्ट्राच्या या लाडक्या एसटीच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त अखंड सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि तिच्यावर विश्वास दाखविणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा. असे अनिल परब यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- “उथळ वागण्यातून गल्लीत खळखळ करणाऱ्यांनी जानकर साहेबांकडून बोध घ्यावा”, रोहित पवारांचा टोला
- “फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा…”, दिपाली सय्यद यांचा टोला
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
- राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह; रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटले..
- “केके यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी”, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केला शोक


