Share

“जीएसटीचे पैसे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी नाहीत” ; अजित पवारांनी भाजपला सुनावलं

Published On: 

पुणे : जीएसटीचे पैसे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यासाठी आले नाहीत. पेट्रोल डिझेलचे दर आम्ही सुद्धा कमी केलेत. मागच्या काळात येणारे पैसे आता आले आहेत. त्याचा आणि याचा काही एक संबंध नाही, असे रोखठोक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात ते एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यावरून भाजपकडून सातत्याने महविकास आघाडी सरकारवर टीका करत असते. इंधनाचे दर कमी करा असे म्हटले तर, हे जीएसटीच्या थकीत परताव्यावर बोलत असतात, असा आरोप भाजकडून नेहमी करण्यात येतो.

आता याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे. “विकासकामांसाठी हे जीएसटीचे पैसे आहेत. या पैशांचा योग्य ठिकाणीच वापर झाला पाहिजे. जीएसटीचे १५००० कोटी येणे अजूनही बाकी आहे. आता आलेले पैसे हे मागील थकबाकी आहे. ते टप्प्याटप्प्याने येत आहेत. राहिलेला उर्वरित पैसे लवकर द्यावेत ही माफक अपेक्षा. एकूण २९००० कोटी रुपये येणे बाकी होते.

भाजपच्या आरोपावर अजित पवार म्हणाले, जीएसटीचे आलेले पैसे हे इंधनदर कपातीसाठी आलेले नाही. राज्यात इतरही अनेक समस्या आहेत. शेवटी राज्याचा गाडा ही नीट चालला पाहिजे. अनेक गरजू लोक आहेत त्यांच्या समस्या आहेत. त्या सोडण्यासाठी या पैशाचा वापर करता येईल, असेही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!