मुंबई : गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना केकेला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे तो परत हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्यानंतर त्याला कलकत्ता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान केके यांचा मृत्यू कसा झाला, याबाबत आता शंका व्यक्त केल्या जात आहेत.
केके यांचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे घातपात होता, अशी चर्चा सुरु आहे. महत्वाचे म्हणजे कोलकाता येथील न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. एनएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केके यांच्या मृत्यूनंतर पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू झाल्याची केस दाखल झाली आहे. पोलिसांकडून या दृष्टीने तपास होण्याची शक्यता आहे.
दरम्यान केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. बॉलीवूड तसेच राजकीय क्षेत्रातील अनेत दिग्गजांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “… शोध भविष्यात इतिहासाचार्य पवार लावू शकतात”, अतुल भातखळकर यांचा टोला
- “जीएसटीचे पैसे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी नाहीत” ; अजित पवारांनी भाजपला सुनावलं
- वर्धापनदिनी एसटी ‘शिवाई’ या नव्या रूपात दाखल होणार; अनिल परबांची माहिती
- “उथळ वागण्यातून गल्लीत खळखळ करणाऱ्यांनी जानकर साहेबांकडून बोध घ्यावा”, रोहित पवारांचा टोला
- “फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा…”, दिपाली सय्यद यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

