Share

“… शोध भविष्यात इतिहासाचार्य पवार लावू शकतात”, अतुल भातखळकर यांचा टोला

Published On: 

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (जामखेड) येथे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचीही उपस्थिती होती. यावेळी शरद पवारांनी जो दृष्टीकोन अहिल्यादेवींनी ठेवला होता, आज नेमके तेच सूत्र नजरेपुढे ठेवून तुमचा आमदार या भागामध्ये काम असल्याचे म्हणत त्यांनी रोहित पवारांचे (rohit pawar) कौतुक केले. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी टोला लगावला आहे.

“अत्यंत धार्मिक आणि आयुष्यभर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा वसा घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि कायम बाबरी आणि ज्ञानवापी मशिदीची कड घेणारे शरद पवार हे दोन वैचारिक ध्रुव आहेत. अहिल्यादेवींनी मशिदींचा सुद्धा जीर्णोद्धार केला होता, असा शोध भविष्यात इतिहासाचार्य पवार लावू शकतात.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

नेमके काय म्हणाले शरद पवार?

आज अहिल्यादेवींचे स्मरण करताना तुमच्या तरूण आमदाराने इथे उद्योग वाढावेत यासाठी इथे एमआयडीसी कशी होईल याकरता उद्योग मंत्र्यांसोबतही बैठका घेतल्या, जमिनीची निवड केली आणि या भागात एमआयडीसी येईल, कारखाने उभे राहतील याची पूर्ण तयारी याठिकाणी केली आहे. अहिल्यादेवींनी आपल्या राजवटीत दळणवळणाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केले. अनेक ठिकाणचे रस्ते केले. मी बघतोय की रोहितने जबाबदारी घेतल्यानंतर दोन अत्यंत महत्त्वाचे महामार्ग या भागासाठी मंजूर झाले. त्यांच्या कामाची प्रत्यक्षपणाने सुरुवात झाली.

त्यामुळे रस्ते, पाणी वा रोजगार असो, हा दृष्टीकोन जो अहिल्यादेवींनी ठेवला होता, आज नेमके तेच सूत्र नजरेपुढे ठेवून तुमचा आमदार या भागामध्ये काम करतोय याचा मला मनापासून आनंद आहे. विकासाची गंगा या भागात यावी याची काळजी घेणे हे त्यांचे कर्तव्य म्हणून ते काम करत आहेत. असे कौतुक शरद पवारांनी रोहित पवार यांचे केले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!