Share

IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकानं जिंकला टॉस, ‘अशी’ आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील दुसरा टी-२० सामना आज खेळायला जाणार आहे. हा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळायला जाईल. सामन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले होते. भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यात यश आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून वान डर डूसेन आणि डेव्हिड मिलर यांनी धडाकेबाज खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला होता.

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. मागील सामन्यात गोलंदाजांचा कडून झालेल्या चुकांना भारतीय संघात टाळण्याचाही प्रयत्न करेल. दोन्ही संघांचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. या मैदानावर अगोदर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये मोठ्या धावसंख्येचे सामने झाले आहेत. या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना संघाला विजय मिळवायचा असेल तर २०० धावांचे लक्ष्य देणे आवश्यक आहे. मैदान छोटे असल्याने गोलंदाजांचा ही कस लागणार आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमधील बदल पाहिले तर, दक्षिण आफ्रिका संघामध्ये क्विंटन डी कॉकच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनला संधी दिली आहे. तर पहिल्या सामन्यात खेळलेल्या ट्रिस्टन स्टब्स याच्या जागी सलामीवीर फलंदाज रीझा हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. पहिल्या सामन्यात जो संघ मैदानात उतरला होता, तोच दुसऱ्याही सामन्यात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघात बदल होतील असे वाटले होते. मात्र संघ व्यवस्थापनाने कोणतेही बदल केले नाहीत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत – इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका -रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरीक क्लासेन (यष्टीरक्षक) डेव्हिड मिलर, डब्लू पार्नेल, टी स्टब्स ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरीक नॉर्किया, तबरेझ शम्सी.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!