Share

SL vs AUS : श्रीलंकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या ३ षटकांत धडाकेबाज फलंदाजी करत रचला ‘हा’ विक्रम

Published On: 

मुंबई : श्रीलंकाच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना जबरदस्त कामगिरी करत जिंकला. यानंतर संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकाच्या संघाने शेवटच्या ३ षटकात ५९ धावा करून सामना जिंकला होता. टी-२० क्रिकेट इतिहासात धावांचा पाठलाग करताना शेवटच्या ३ षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकासमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकाची स्थिती अत्यंत खराब राहिली होती. अखेरच्या ३ षटकांत त्यांना विजयासाठी ५९ धावांची गरज होती. श्रीलंकाचा कर्णधार दासून शनाकाने धुवांधार फलंदाजी करत संघाला १ चेंडू राखून विजय मिळवून दिला. श्रीलंकाने १८व्या षटकात २२ धावा, १९व्या षटकात १८ धावा आणि शेवटच्या षटकात १९ धावा करून विजय मिळवला.

दासुन शनाकाने शानदार फलंदाजी करत श्रीलंकाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला

१७ वे षटक संपल्यानंतर कर्णधार दासुन शनाका १२ चेंडूत अवघ्या ६ धावा करून खेळत होता. मात्र त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीचा गियर बदलला. १८व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या जोश हेझलवूडविरुद्ध त्याने २ षटकार आणि २ चौकार मारले. त्यानंतर त्याने आणि चमिका करुणारत्नेने पुढच्या षटकात आणखी १८ धावा जोडल्या. अशाप्रकारे श्रीलंकाने अवघ्या २ षटकांत ४० धावा केल्या. यानंतरही संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती. कर्णधार दासून शनाकाने अखेरच्या षटकात केन रिचर्डसनविरुद्ध शानदार फलंदाजी करत श्रीलंका संघाला विजय मिळवून दिला. दासुन शनाकाने २५ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ४ षटकार आले. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या ३ षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता श्रीलंकाच्या नावावर झाला आहे.

या तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने बाजी मारली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवत विजय नोंदवला होता. यानंतर तिसऱ्या सामन्यात श्रीलंकाने दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. श्रीलंकाने ऑस्ट्रेलियावर मोठा विजय मिळवला असल्याने संघामध्ये सध्या आत्मविश्वासाचे वातावरण पसरले आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ श्रीलंकाच्या दौऱ्यावर आला आहे. श्रीलंकामध्ये सध्या आर्थिक वातावरण ताणतणावाचे झाले आहे. अशातच क्रिकेट चाहत्यांना या मालिकेबाबत उत्सुकता लागलेली होती. पण ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकावरील हा दौरा चांगल्या प्रकारे पार पडत असल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!