Share

IND vs SA 2022 : भारताच्या पराभवानंतरही पॉंटिंगनं केलं ऋषभ पंतचं कौतुक; म्हणाला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला. ऋषभ पंतसाठी हा महत्त्वाचा सामना होता. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत कर्णधार म्हणून पदार्पण केले आहे. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने पंतचे जोरदार कौतुक केले आहे.

ऋषभ पंत या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या भारताच्या आयसीसी टी-२० विश्वचषक मोहिमेचा अविभाज्य भाग असावा, असे पाँटिंगने म्हटले आहे. सपाट आणि उसळत्या खेळपट्ट्या असल्याने यष्टीरक्षक-फलंदाज भारतासाठी अत्यंत फायद्याचा ठरणार असल्याचे तो म्हणाला.

“तो (पंत) एक अप्रतिम खेळाडू आहे. तो भारतासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होईल.” दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतची कामगिरी पाहिल्यानंतर या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला वाटले की यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ घतलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान पंतचा हुकुमी एक्का म्हणून वापर करावा. ‘प्रतिभाशाली’ आणि ‘स्फोटक’ क्रिकेटपटूच्या रूपाने पंतला डावखुरा फलंदाज म्हणून विशिष्ट भूमिकेत वापरायला आवडेल,’ असे पाँटिंगला वाटले.

विशेष म्हणजे कालच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २११ धावा केल्या होत्या. यादरम्यान इशान किशनने ७६ धावांची शानदार खेळी केली. ईशानने ४८ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि ३ षटकार ठोकले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकांत सामना जिंकला. आफ्रिकन संघाकडून डेव्हिड मिलरने ६४ धावांची नाबाद खेळी खेळली. मिलरने ३१ चेंडूंचा सामना करत ५ षटकार आणि ४ चौकार लगावले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!