Share

IND vs SA 2022 : हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात ‘का’ दिली नाही दिनेश कार्तिकला स्ट्राइक? पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवारी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७ गडी राखून पराभव केला. यासह भारतीय संघाचा सलग १२ टी-२० सामने जिंकण्याचा विजयरथ रोखला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २११ धावांची भक्कम धावसंख्या उभारली होती. ज्यामध्ये इशान किशनने ४८ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने ३गडी गमावून ५ चेंडू राखून पूर्ण केले. पाहुण्या संघासाठी रस्सी व्हॅन डर डुसेन (नाबाद ७५) आणि डेव्हिड मिलर (नाबाद ६४) यांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद १३१ धावांची भागीदारी करून आपल्या संघाचा विजय मिळवून दिला.

सामन्यात भारतीय संघाचा जरी पराभव झाला असला पण भारतीय स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि अनुभवी दिनेश कार्तिक यांच्यासाठी हा खास सामना होता. हे दोन्ही खेळाडू बऱ्याच दिवसांनी भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत परतले आहेत. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. तर कार्तिकने तब्बल तीन वर्षांनी संघात पुनरागमन केले आहे.

सामन्यादरम्यान हार्दिकने १२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांसह नाबाद ३१ धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या खेळीदरम्यान त्याने शेवटच्या काही चेंडूंमध्ये क्रिझच्या दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या दिनेश कार्तिकला स्ट्राईक देण्यास नकार दिला. एनरिक नॉर्खियाकडून टाकलेल्या फुल लेन्थ चेंडूला मिडविकेटच्या दिशेने मारल्यानंतर पंड्याने एक धाव घेण्यास आणि कार्तिकला स्ट्राइक देण्यास नकार दिला. स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांसाठी हे आश्चर्यकारक दृश्य होते. हे दृश्य पाहून क्रिकेट चाहते निराशही झाले. दिनेश कार्तिक एक अनुभवी फलंदाज असून त्याच्याकडे दमदार फटके मारण्याची क्षमता आहे.

https://twitter.com/RohitKohliDhoni/status/1534917239740465155?t=-WZtAOoWRHZJDTlqkuCEiA&s=19

सामन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने २१२ धावांचे लक्ष्य ५ चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखून पूर्ण केले. या पराभवात सोबत भारताचे सलग १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विजयरथ थांबला. काल झालेला सामना जिंकून भारताला विश्वविक्रम रचण्याची संधी होती. कारण सलग १३ सामने जिंकणारा भारत पहिला देश बनला असता. पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आता १-० ने आघाडीवर आहे. मालिकेतील दुसरा टी-२० सामना १२ जून (रविवार) रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाईल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!