Share

IND vs ENG : शार्दुल ठाकूरने त्याच्या लॉर्ड या टोपणनावाबाबत केला खुलासा; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्यापासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर सुरू होत असलेल्या ५ व्या आणि शेवटच्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी भारतीय अष्टपैलू शार्दुल ठाकूरने सांगितले की, तो संघातील त्याच्या भूमिकेचा आनंद घेत आहे. जोपर्यंत मुख्य गोलंदाज ब्रेकवर आहेत, तोपर्यंत तो चांगली कामगिरी करणार आहे. तो म्हणाला की, याक्षणी आमच्या वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यासह प्रत्येकजण चांगली कामगिरी करत आहे. यापूर्वी इशांत शर्माही त्यात होता आणि सहसा तो नवीन चेंडूने सुरुवात करायचा. काही वेळा असे व्हायचे की तो पहिल्या स्पेलमध्ये २-३ विकेट घेईल आणि मला नंतर गोलंदाजी करण्याची संधी मिळायची. यादरम्यान शार्दुलने आपल्या टोपणनावाबद्दलही खुलासा केला. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने पुढे आहे. अशा स्थितीत भारताला मालिका जिंकण्यासाठी या सामन्यात फक्त अनिर्णित राहण्याची गरज आहे.

भारतीय संघातील उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना सांगितले की, ‘जेव्हा भागीदारी सुरू असते आणि मुख्य गोलंदाजाला विश्रांती द्यावी लागते तेव्हा मला गोलंदाजी करायला मिळते. या निमित्ताने माझ्यासाठी बळी मिळवण्याची आणि संघासाठी काहीतरी करण्याची संधी असते.’ तो म्हणाला की अशा परिस्थितीत गोलंदाजी करणे हे माझे काम आहे आणि मला ते आवडते कारण मी चांगली कामगिरी केली तर त्याचा संघासाठी फायदा होतो.

https://www.instagram.com/p/CfapOF_jre3/?igshid=YmMyMTA2M2Y=

इंग्लंडमध्ये चेंडूला स्विंग मिळते
ओव्हल येथील चौथ्या कसोटीत इंग्लंडवर १५७ धावांनी विजय मिळवण्यात शार्दुल ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीत खेळणाऱ्या भारतीय संघात ठाकूरचा समावेश आहे. शार्दुल म्हणाला की, ‘मला वाटते की इंग्लंडमधील खेळपट्ट्या गोलंदाजांसाठी स्वर्ग आहे. कारण तेथे चेंडू खूप स्विंग होतो आणि कधीकधी तुम्ही एका स्पेलमध्ये खूप बळीही मिळवता. म्हणूनच मला वाटते की क्रिकेट खेळण्यासाठी आणि गोलंदाजी करण्यासाठी इंग्लंड हे माझे आवडते ठिकाण आहे. इंग्लंडमध्ये बरीच ‘लॅटरल मूव्हमेंट’ आहे आणि ती कशी वापरायची हे तुमच्यावर अवलंबून आहे.’

आम्ही पुनरागमन करू शकलो
ओव्हलवरील चौथ्या कसोटीत शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने सामन्याच्या दोन्ही डावात दोन महत्त्वपूर्ण अर्धशतकांसह महत्वाचे बळी घेतले होते. या सामन्यात पहिल्या डावात त्याने ३६ चेंडूत ५७ धावा केल्या, ज्यामुळे भारताला १९१ धावा करता आल्या. दुसऱ्या डावात त्याने ७२ चेंडूत ६० धावा केल्या होत्या. आपल्या कामगिरीची आठवण करून देताना तो म्हणाला की, या महत्त्वपूर्ण खेळी होत्या. या सामन्यात इंग्लंड वर्चस्व मिळवू शकला असता परंतु आम्ही एकत्रित खेळ दाखवत हा सामना जिंकला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!