🕒 1 min read
मुंबई : गेले दहा दिवस राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यानंतर अखेर आज महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. यानंतर आज दुपारी पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होत. मात्र शिंदे यांचं नाव आता मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झालं आहे. यानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु आहेत.
यानंतर देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात नसणार आहेत. मात्र ते बाहेरून सरकार चालवण्यास हातभार लावणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं. यानंतर आता भाजपातून उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत काही नावे समोर आली आहेत. उपमुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे या दोन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असा आग्रह व्यक्त केला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस हे नड्डा यांचा प्रस्ताव स्वीकारणार का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज एकनाथ शिंदे रात्री ७ : ३० ला शपथ घेणार आहेत. आज राजभवन येथे अतिशय छोटेखानी पद्धतीन शिंदे यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
