Share

Swara Bhaskar : मोठी बातमी! अभिनेत्री स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी

Published On: 

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता या अभिनेत्रीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिला ठार मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. या पत्रामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. स्वराला तिच्या राहत्या घरी स्पीड पोस्टद्वारे हे धमकी पत्र मिळाले आहे.

स्वराला हे पत्र दिल्ली या ठिकाणाहून पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. या पत्रामध्ये अत्यंत हीन अपशब्द वापरून धमकी देण्यात आली आहे. “सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही , तसेच त्यांच्याबद्दल काहीही बोललीस तर जीवाला मुकशील”, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.

“सावरकरांचा अपमान करणे थांबव आणि चित्रपटांवर लक्ष दे”, असा देखील या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाबाबत स्वराने वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, स्वरा भास्करने २०१७ मध्ये सावरकरांवर भाष्य करत एक ट्विट केले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!