Share

Devendra Fadanvis : देवेंद्रजीं ना हिणवणाऱ्यांनो त्याच देवेंद्रजींनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय ! – चित्रा वाघ

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय उलथापालथीमध्ये भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली असून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले. शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 7.30 वाजता शपथ घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषानेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडल्याच चित्र दिसत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांचे समर्थक जल्लोष करताना दिसत आहेत तर दुसरीकडे भाजपने शिवसैनिकाला संधी  देऊन शिवसेनेची गोची केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट च्या माध्यमातून महाविकास आघाडीवर जहरी टीका केली आहे. १०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून देवेंद्रजीं ना हिणवणाऱ्यांनो त्याच देवेंद्रजींनी अख्खं राज्य सरकार घरी बसवलंय !” अशा आशयाच ट्विट चित्र वाघ यांनी केले आहे

चित्रा वाघ यांनी केलेल्या या घणाघाती टीकेमुळे पुन्हा एकदा भाजप शिवसेना वाद समोर आला आहे. राजकीय वर्तुळात एकापाठोपाठ एक असे भूकंप होत आहेत.

दरम्यान, भाजपसोबत आमची नैसर्गिक युती असून आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार. आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत. फडणवीस सरकारमध्ये नसले तरी ते सरकारच्या पाठीशी आहेत. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. तसेच या सरकारचे केंद्राशीही चांगले संबंध असतील आणि आम्ही राज्यासाठी केंद्रासोबत काम करू, असे सांगितले. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने आम्हाला अधिक बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!