🕒 1 min read
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ फलंदाजीस उतरला तेव्हा क्रिकेटच्या त्यांना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. कारण आजच्या सामन्यात भारताकडून ईशान किशन, विराट कोहली नव्हे तर ऋषभ पंतने सलामी दिली. रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र मधल्या फळीतील कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. रवींद्र जाडेजाच्या दमदार केळीच्या बळावर भारताने इंग्लंडला १७१ धावांचे लक्ष दिले आहे.
भारताचा डाव
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने चांगले सुरुवात केली. दोघांनीही पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. यानंतर रोहित शर्मा ३१ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली १ धावांवर बाद झाला. ऋषभ पंत (२६ धावा), सूर्यकुमार यादव (१५ धावा), हार्दिक पंड्या (१२ धावा) हे मधल्या फळीतील फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. मात्र शेवटी रवींद्र जडेजा (४६ धावा) उत्कृष्ट कामगिरीच्या वेळेवर भारताला १७० धावा करण्यात यश आले. इंग्लड कडून गोलंदाजी करताना क्रिस जॉर्डनने सर्वाधिक चार गडी बात केले. तर त्याच्या साथीला रिचर्ड ग्लीसनला ३ गडी बाद करण्यात यश आले.
Innings Break!
After being put to bat first, #TeamIndia post a total of 170/8 on the board. @imjadeja top scored with a fine 46* in the innings.
Scorecard – https://t.co/e1QU9hl9MM #ENGvIND pic.twitter.com/TOUuhCQfvk
— BCCI (@BCCI) July 9, 2022
विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप
मागील काही काळापासून विराट कोहली त्याच्या फॉर्मशी झगडताना दिसत आहे. आयपीएल पाठवा आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही खराब कामगिरीचा सामना करत आहे. आयपीएल नंतर विराट पहिल्यांदाच मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळला. मात्र त्याला या सामन्यात १ धावसंख्येवर तंबूत परतावे लागले. विराट कोहली चा खराब फॉर्म भारतासाठी डोकेदुखीत करत आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी विराटची खराब कामगिरी भारतासाठी अडचणी निर्माण करू शकते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
