🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आज या दोन्ही संघामध्ये मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला जाणार आहे. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडचा करणार जोस बटलरने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ५० धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. भारताच्या युवा खेळाडूंनी या सामन्यात इंग्लंडच्या संघाला पराभवाचे तोंड दाखवले. दीपक हुडा हार्दिक पंड्या तसेच गोलंदाजीत अर्शदीप सिंग यांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र या सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत पुनारगमन करण्याच्या उद्देशाने उतरेल. तसे पाहिले तर या मैदानावर इंग्लंडची कामगिरीही उत्तम राहिलेली आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची संधी असेल.
विराट कोहलीचे संघात पुनरागमन
मागील काही काळापासून खराब फॉर्म मध्ये असलेला विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. कसोटी सामन्यामुळे विराट कोहली पहिल्या सामन्यासाठी संघात सामील करण्यात आले नव्हते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी विराट सह इतर वरिष्ठ खेळाडूंचेही संघात पुनरागमन झाले आहे. इशान किशनच्या विराट आजच्या सांगण्यात कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. या सामन्यात विराटकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातही विराट कोहलीला धावा करण्यात अपयश आले होते. त्यामुळे सर्वच क्रिकेट प्रेमींचे विराटच्या फलंदाजी कडे लक्ष असणार आहे.
दोन्ही देशांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह
इंग्लंड – जोस बटलर, जेसन रॉय, डेविड मलान, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रुक्स, सॅम करण, डेव्हिड विली, क्रिस जॉर्डन, मॅट पार्किन्सन, रिचर्ड ग्लीसन
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
