🕒 1 min read
मुंबई : सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आंदोलक श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या घरात घुसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यानंतर राजपक्षे घरातून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक माध्यमांकडून ही माहिती समोर आली आहे. अश्याप्रकारचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यात राष्ट्रपती राजपक्षे यांच्या घराच्या आत बांधलेल्या स्विमिंग पूलमध्ये आंदोलक आंघोळ करताना दिसत आहेत. त्याचवेळी आंदोलक कोलंबोतील राष्ट्रपती कार्यालयातही घुसले आहेत. यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, श्रीलंकेला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या याचाही एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो कोलंबोतील राष्ट्रपती कार्यालयाबाहेर राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकांसोबत निदर्शने करताना दिसत आहे. जयसूर्याने राष्ट्रपतींच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्याने स्वत: त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत संबंधित काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यासोबत त्यांने लिहिले की, “मी नेहमीच श्रीलंकेच्या लोकांसोबत उभा आहे. लवकरच आम्ही विजय साजरा करू. हा निषेध हिंसाचार न करता असाच चालू ठेवावा.”
???? Protesters cool down in President's swimming pool after storming his official residence in Fort. pic.twitter.com/jROaa4NDWy
— NewsWire ???????? (@NewsWireLK) July 9, 2022
Video footage of Sri Lankan protesters taking over President's office in Colombo
???? Buddi U Chandrasiri pic.twitter.com/FINwaaqUat
— NewsWire ???????? (@NewsWireLK) July 9, 2022
राष्ट्रपतींना राजीनामा देण्याची जयसूर्याची मागणी
सनथ जयसूर्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून काही पोस्ट शेअर केले आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एखाद्या अपयशी नेत्याला त्याच्या खुर्चीवरून खाली उतरवण्यासाठी जनतेला एवढ्या मोठ्या प्रमाणात एकजूट होताना या अगोदर पाहिलेले नाही. त्यामुळे तुम्ही कृपया शांतीपूर्ण मार्गाने आपले पद सोडावे.”
“आम्ही आशियातील सर्वात जुन्या लोकशाहींपैकी एक आहोत. तुम्ही तुमच्या नाही तर या देशातील जनतेच्या रक्षणाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही जनतेची पुन्हा परीक्षा घेऊ नका. पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही आगे शी खेळत आहात.” असे जयसूर्याने लिहिले आहे.
https://twitter.com/Sanath07/status/1545695749177896960?t=LINZN2rmb9qliAcEk5Qbmg&s=19
https://twitter.com/Sanath07/status/1545693749400854529?t=p09D4G-94j05ZI3-qILtvQ&s=19
पंतप्रधान विक्रमसिंगे यांची तातडीची बैठक
दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. देशातील सद्यस्थितीवर चर्चा करून त्यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. संसदेचे अधिवेशन बोलावण्याची विनंतीही पंतप्रधानांनी सभापती महिंदा यापा यांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
