🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडा पुकारल्यानंतर पक्षाचे अनेक आमदार त्यांच्यासोबत महाराष्ट्र बाहेर गेले होते. त्यादरम्यान हिंगोलीचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांसोबत मिळून मोठी रॅली काढत पक्षातून गेलेले आमदारांना वापस येण्याची साद घातली होती. या रॅलीला संबोधित करताना संतोष बांगर भावुक देखील झाले होते. त्यांचा आमदारांना साद घालण्याचा भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र तेच संतोष बांगर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात मतदान करताना दिसली. ते शिंदे गटात सामील झाले. त्यांचं हे मतपरिवर्तन झालेला पाहून अनेक शिवसैनिकांना तर धक्काच बसला असेल. यानंतर आता संतोष बांगर यांनी अचानक शिंदे गटाची माळ का गळ्यात घातली याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मी शिवसेनेसाठी जिल्ह्यात महारॅली काढली व या रॅलीद्वारे आमदारांना भावनिक आवाहनही केले होते. मात्र यानंतर मी कार्यकर्त्यांना व मतदारांना विचारणा केली असता त्यांनी मला एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा सल्ला दिला. कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की बाळासाहेबांचा सामान्य शिवसैनिक जर मुख्यमंत्री पदावर बसत असेल तर त्याला पाठिंबा देणे योग्य आहे. म्हणून मी मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले व त्यांना पाठिंबा दिला. असे यावेळी बोलताना बांगर म्हणाले.
तसेच महाविकास आघाडी सरकार बाबत बोलताना संतोष बांगर म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार सर्वसामान्य जनतेला तसेच शिवसैनिकांना व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मान्य नव्हते. भाजप शिवसेना यांची युती नैसर्गिक होती. त्यामुळे ही व्यक्ती पुन्हा कायम राहावी अशीच सर्वांची इच्छा होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर व पुन्हा शिवसेना भाजप युती झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे ही आनंदीत झाले असतील. त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या कामास शाबासी दिली असेल असे यावेळी बांगर म्हणाले.
यावेळी संतोष बांगर यांनी राष्ट्रवादी बाबत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवार यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती निधी दिला आहे त्यांनी सांगावं. बाळासाहेबांनी सांगितले होते की काँग्रेस राष्ट्रवादी सोबत कधीच सत्तेत बसू नका. राष्ट्रवादी त्यांचे आमदारांची संख्या १०० पार नेण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे शिवसेनेला संपवण्याचाही काम करत आहे. अशी ती काही यावेळी संतोष बांगर यांनी राष्ट्रवादीवर केली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
